जुनी संस्कृती जोपासण्यासाठी व नवीन पिढीला त्याची ओळख करून देण्यासाठी आम्ही मैत्रीणी एकत्र आलो व तयार झाला "जागृती कला मंच". २०१० च्या गणपती उत्सवात प्रथम आम्ही आमची कला सादर केली (१८/९/२००८). त्यानंतर आमच्या घरच्यांच्या पाठींब्याने व प्रतिसादाने आम्ही चिंचवड येथील विरंगुळा केंद्र या जेष्ठ नागरीक संघात आमचा दुसरा कार्यक्रम सादर केला , व आज तागायत विविध ठिकाणी कार्यक्रम केले.
चंद्राच कले कलेनी वाढणं आणि कमी होणं जसा प्रेमी युगुलांच्या प्रेमाचं उदाहरण असतं अगदी तसच ते प्रतीक असता आपल्या मराठी सणांच आणि मराठी महिन्यांचं सुद्धा, अशाच पौर्णिमांचे आणि आपल्या सणांचें घनिष्ठ संबंध तुमच्या समोर उलगडत आहोत आमच्या नवीन कार्यक्रमातून ज्याचं नाव आहे "तोच चंद्रमा नभात".
नवरात्र म्हणजे 'ती' चा उत्सव, 'ती' ची पुजा..तिच्या मनात नाही भक्तांसाठी भाव दुजा.. 'ती' कधी शांत,कधी प्रसन्न,कधी दुर्गा,कधी काली. तिने शक्तीने सर्व भक्तांची दु:खे हरली. अश्या ह्या देवीमातेचे अस्तित्व एक पण रूप अनेक. जशी ती आपल्या मनी वसते तशी ती आपल्याला दिसते. अश्या ह्या चैतन्यरूपी शक्तीचे तिच्या भक्ताच्या मनातील विविधरंगी छटांचे वर्णन करणारा कार्यक्रम घेऊन येतोय....जागृती कला मंच चिंचवड प्रस्तुत "नवरूपा,अस्तित्व एक रूप अनेक". २८ सायंकाळी ७. ०० वाजता शिवाजी उदय मंडळ,पोद्दार शाळेजवळ चिंचवड . या आधीच्या कार्यक्रमासारखीच दाद याही आमच्या प्रयत्नांना द्याल हीच आशा.
आमचे विविध नृत्याविष्कार -: १)रंग लोककलेचे २) मंगळागौर ३) डोहाळजेवण ४)तोच चंद्रमा नभात ५)बारसे ६)रंग नात्यांचे ७) सफर सुनहरी यादोंका! ८ नवरूपा ,आस्तित्व एक रूप अनेक